
पेपरफुटीविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. हे प्रकार सुरू राहिल्यास कॉक्रोच जनता पार्टी देशभरात मोठे आंदोलन सुरू करेल,’ असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज दिला.
‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून दीपके यांनी हा इशारा दिला आहे. जंतरमंतरवरील आंदोलन थांबले असले तरी ही चळवळ थांबणार नाही. ही केवळ सुरुवात आहे. आणखी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, असे अभिजित दीपके म्हणाले.






























































