
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. ‘सत्ताधारी बाकांवर बसलेल्या बहुतेक मोठ्या नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. नाव घेऊन मी सांगू शकतो. अशा लोकांना पेपर फुटल्यामुळे गरीबांना व वंचितांना होणाऱ्या वेदना काय कळणार,’ असा सवाल अरविंद सावंत यांनी केला,
परीक्षा पद्धती सुधारणा विधेयकावर ते बोलत होते. ‘आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पायाच डळमळीत आहे. प्राथमिक शिक्षणातच विषमता आहे. शिक्षण शुल्कातही समानता नाही. प्राथमिक शिक्षणावरच लक्ष नसेल तर मुले मोठी कशी होणार,’ असा सवाल त्यांनी केला. जेन झी आंदोलनाचे मूळ यातच आहे, असे ते म्हणाले.






























































