
आसाम, बिहार या भाजपशासित राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश गृह विभागाला दिले.
बिहार आणि आसाम या राज्यांमधील सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनेही या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.






























































