बलात्काऱ्यांचा बचाव करणाऱ्याला भाजपने शिक्षणमंत्री केले! – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांना शिक्षण मंत्री करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज तीव्र आक्षेप नोंदवला. ‘बेजबाबदार शिक्षण मंत्री बदलण्यासाठी देशातील तरुण-तरुणींनी इतके मोठे आंदोलन केले. मार खाल्ला. एवढे सगळे झाल्यानंतर भाजपने बलात्काऱ्यांचा बचाव करणाऱ्या माणसाला शिक्षण मंत्री केले आहे, असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

बलात्काऱयांना संरक्षण दिले पाहिजे असे म्हणणाऱयापेक्षा घाणेरडा माणूस असूच शकत नाही. असा माणूस आज शिक्षण मंत्री आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही ही जबाबदारी देता आली असती, पण त्यांनी बलात्काऱयांचा बचाव करणाऱयाला निवडले. हे धक्कादायक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.