Asian Games 2026 साठी पुरुष हॉकी संघाची घोषणा, पुन्हा एकदा सुवर्ण पदकासाठी हिंदुस्थान सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमधील आचि-नागोया येथे होणाऱ्या 20 व्या Asian Games 2026 साठी हॉकी इंडियाने 20 सदस्यीय हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या महामुकाबल्यात हिंदुस्थानचा संघ पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावण्याच्या आणि थेट लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चे तिकीट मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. अनुभवी स्टार ड्रैग-फ्लिकर हरमनप्रीत सिंहकडे दुसऱ्यांदा संघाचे कर्णपद भूषवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांना युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या या मिश्रणाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

पूल-ए मध्ये स्थान मिळालेला हिंदुस्थानचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर 22 सप्टेंबरला श्रीलंका, 24 सप्टेंबरला दक्षिण कोरिया, 26 सप्टेंबरला यजमान जपान आणि 28 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध सामने खेळले जातील. हे सर्व सामने जपानमधील काकामिगहारा येथील गिफू प्रेफेक्टुरल ग्रीन स्टेडियमवर पार पडतील. कर्णधार हरमनप्रीतने खेळाडूंना दबावात न येता आपल्या खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी पुरुष हॉकी संघ

गोलकीपर: मोहित एचएस, सूरज करकेरा

डिफेंडर: जरमनप्रीत सिंह, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंह, संजय, सुमित, यशदीप सिवाच

मिडफिल्डर: राजिंदर सिंह, राज कुमार पाल, हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद

फॉरवर्ड: दिलप्रीत सिंह, शिलानंद लकड़ा, सुखजीत सिंह, मनदीप सिंह, अभिषेक