
जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील साडेतीन वर्षांचा ‘जय’ हा नर वाघ पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. विविध खेळकर क्रीडा, चपळ हालचाली आणि पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी उत्सुकतेने जवळीक साधणाऱ्या ‘जय’च्या मनमोहक अदांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे. व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश देणाऱ्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘जय’ ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
सर्व फोटो – संदीप पागडे




























































