ग्लासगोमध्ये दिमाखात फडकला तिरंगा! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १३ सुवर्णांसह हिंदुस्थान चौथ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची जोरदार लूट करत ग्लासगोमध्ये तिरंगा दिमाखात फडकवला. स्पर्धेच्या अखेरीस हिंदुस्थानने १३ सुवर्ण १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. मर्यादित क्रीडा प्रकार असूनही हिंदुस्थानी खेळाडूंनी अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद करत दमदार कामगिरी केली हे विशेष!

 

या स्पर्धेत हिंदुस्थानचा सर्वात मोठा आधार ठरले ते आपले बॉक्सर्स, सात सुवर्ण आणि तीन रौप्य अशी विक्रमी १० पदके जिंकत हिंदुस्थानी बॉक्सिग संघाने इतिहास रचला. एका राष्ट्रकुल स्पर्धेत एका देशाने जिंकलेल्या सात सुवर्णपदकांचा हा विक्रम ठरला. प्रीती पवार, जैस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया घंघास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्णपदके पटकावली, तर लव्हलिना बोगहिन, जादुमणी सिंग आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्य जिंकले.

 

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक पटकावत हिंदुस्थानच्या सुवर्णपदकांचे खाते उघडले. या प्रकारात हिंदुस्थानने एक सुवर्ण सहा रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण आठ पदके जिंकली.

 

ज्युदोमध्ये अस्मिता डे हिने हिंदुस्थानला या स्पर्धेतील पहिले सुवर्ण मिळवून देत इतिहास घडवला. काही मिनिटांतच हर्ष सिंगनेही सुवर्ण जिंकत हिंदुस्थानची भरारी कायम ठेवली. यामिनी मौर्यन रौप्य, तर उन्नती शमनि कांस्यपदक पटकावले. अॅथलेटिक्समध्ये गुलवीर सिंगने १० हजार मीटरमध्ये रौप्य आणि ५ हजार मीटरमध्ये कांस्य जिंकून एका राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला हिंदुस्थानी धावपटू होण्याचा मान मिळवला. नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्य जिंकत  राष्ट्रकुलमधील दुसरे पदक आपल्या नावावर केले. मुरली श्रीशंकर, सर्वेश कुशारे आणि प्रवीण चित्रावेल यांनी रौप्य, तर तेजस्विन शंकर, यशवीर सिंग, सीमा कालिरामना आणि सेल्वा प्रभू यांनी कांस्यपदके मिळवली.

पॅरा स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी २८ वर्षानंतर पन्नाशीतच

हिंदुस्थानची कामगिरी समाधानकारक असली तरी गेल्या २८ वर्षांतील ही नीचांक गाठणारी कामगिरी ठरली आहे. २००२ सालापासून हिंदुस्थानने ५० पेक्षा अधिक पदके जिंकली आहेतः मात्र यंदा हा आकडा ३९ पदकांवर थांबला. १९९८ साली हिंदुस्थानने २५ पदके जिंकली होती. त्यानंतर २००२ साली पन्नाशी गाठत ६९ पदके जिंकली होती. त्यानंतर प्रथमच हिंदुस्थानचा पदकांचा आकडा पन्नाशीच्या आत थांबला आहे.

मिळवले पॅरा क्रीडाप्रकारांमध्ये हिंदुस्थानने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी सात पदके जिंकत हिंदुस्थानी पॅरा खेळाडूंनी नवा इतिहास रचला. पॅरा अॅथलेटिक्समध्ये शर्मिला धनकर, दिलीप गावित आणि सोमन राणा यांनी सुवर्णपदके जिंकली. शुभम जुयाल, मोहम्मद बासिल यांनी रौप्य, तर शिल्पा के. शायला यांनी कांस्य पटकावले.