
मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) च्या आडून भारतीय जनता पक्ष समांदर मतदार पडताळणी करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट करत हा आरोप केला आहे.
एसआयआर मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली हे पश्चिम बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिले. एकीकडे हे एसआयआर प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपनेही गावपातळीवर आपल्या बीएलएमार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली असून त्यांना दिलेल्या लिंकमध्ये मतदारांची पडताळणी केली जाते आणि ही पडताळणी करताना या लिंकमध्ये मतदारांच्या नावापुढे आपले, संदिग्ध, विरोधी असे तीन पर्याय दिलेले आहेत. यापैकी एका पर्यायाची निवड करुन मतदारांची वर्गवारी करण्याचं काम सुरू आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. यासोबत रोहित पवार यांनी काही फोटोही शेअर केले आहेत.
भाजपच्या समांतर मतदार पडताळणीवरून रोहित पवार यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. शासकीय यंत्रणा एसआयार मोहिम राबवत असेल तर त्याच वेळी भाजपनेही आपली समांतर यंत्रणा या कामी कशी लावली? संदिग्ध आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचा किंवा त्यांना भलत्याच ठिकाणी दाखवण्यासाठी तर हे केले जात नाही ना? कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांच्या वैयक्तिक किंवा गोपनीय रेकॉर्ड्चा वापर करुन स्वतःची समांतर राजकीय मोहिम चालणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं कोर्टाने सांगितलं असतानाही भाजप हे कोणत्या अधिकारात करत आहे? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहते. तसेच या प्रश्नांची उत्तरे भाजपाने द्यावीत आणि निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
SIR मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली हे प. बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिलं. एकीकडं हे SIR प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपानेही गावपताळीवर आपल्या BLA मार्फत स्वतंत्र यंत्रणा… pic.twitter.com/W8sVqd6O6p
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 4, 2026





























































