“रामाच्या नावाने लूट केली, त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी”, मोदींचे नाव घेत मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिर देणगी घोटाळा आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जवर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातही याचे पडसाद उमटत असून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. प्रभू श्रीरामाच्या नावाने लूट करणाऱ्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी आणि देशाची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत केली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यसभा दणाणून सोडली. यामुळे राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूबही करण्यात आले.

दरम्यान, संसदेबाहेरही विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर देणगी चोरीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अमित शाह सदन में आओ, सदन में आकर जवाब दो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला.