
तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री त्रिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणी मंगळवारी सकाळी तामिळनाडू पोलिसांनी त्यांना चेन्नई येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. यामुळे तामिळनाडूत खळबळ उडाली असून डीएमकेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
तामिळनाडूमध्ये कावेरी प्रश्नाबाबत आयोजित एका रॅलीदरम्यान गर्दीतून त्रिशा, त्रिशा… अशी घोषणाबाजी केली. त्यावेळी उदयनिधी हे भाषण करत होते. ही घोषणाबाजी ऐकून त्यांनी एक विधान केले होते. यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आपण चुकीचे बोललो नसून कुणाचे नावही घेतले नसल्याचे स्पष्टीकरण देत उदयनिधी यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
#WATCH | Tamil Nadu | DMK leader and LoP Udhayanidhi Stalin detained by Police from his Chennai residence, following an FIR against him over his alleged defamatory remarks against CM Vijay pic.twitter.com/d1evXEG2By
— ANI (@ANI) August 4, 2026



























































