‘एलआयसी’मधील हिस्सा मोदी सरकार विकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

केंद्रातील मोदी सरकार एलआयसीमध्ये ऑफर फॉर सेलद्वारे 6.5 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकणार आहे. सरकारने या विक्रीसाठी प्रति शेअर 382 रुपयांचा फ्लोर प्राइस निश्चित केला आहे. या ऑफर फॉर सेलचा मुख्य उद्देश मे 2017 च्या अंतिम मुदतीपूर्वी सेबीच्या किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग नियमांचे पालन करणे आहे.

एलआयसीने दिलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, ही ऑफर 2 टक्के इक्विटी हिश्श्याच्या बेस सेलने सुरू होईल. या अंतर्गत, अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून 12.65 कोटी शेअर्स विकले जातील. फ्लोर प्राइसवर संपूर्ण 6.5 टक्के हिस्सा विकल्यास सरकारला जवळपास 31,410 कोटी रुपये मिळतील.