
आर्थिक किंवा इतर सायबर फसवणूक झाल्यास आता घरबसल्या नॅशनल सायबर क्राईम रिपार्टिंगग पोर्टल वर किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.
आर्थिक फसवणूक झाल्यास लवकरात लवकर तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. यामुळे तुमचे पैसे खात्यात गोठवण्यास आणि परत मिळवण्यास मदत होते.
cybercrime.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन तक्रार दाखल करा. अधिकृत सायबर क्राईम पोर्टल वर जा. ‘File a complaint’ वर क्लिक करा आणि अटी स्वीकारून पुढे जा.
‘Citizen Login’ पर्यायावर क्लिक करून स्वतःचा मोबाईल नंबर आणि बेसिक माहिती भरा, तसेच ओटीपी द्वारे लॉगिन करा आणि घटनेचा घडलेल्या प्रकारची सविस्तर माहिती भरा.
बँक व्यवहाराची पावती, चॅटचे किंवा मेसेजचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून जोडा. फॉर्म तपासून तो सबमिट करा. तुम्हाला एक युनिक तक्रार क्रमांक मिळेल, तो जपून ठेवा.

























































