
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
वादग्रस्त अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पद सहा महिने रिकामीच होते. नागवडे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीच्या महिला संघटनेला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
वैशाली नागवडे या पुणे जिह्याच्या दौंड तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. महानंदाच्या संचालिका, दौंड पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी पुणे जिह्याच्या अध्यक्षा अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. याच वर्षी त्यांची महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदीही निवड झाली.





























































