
विविध अभियांत्रिकी आणि देखभालदुरुस्तीच्या कामाकरीता मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यानच्या हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान हार्बर लाईनवर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत येणाऱ्या किंवा तेथून सुटणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे (डाऊन हार्बर लाईन) दरम्यान सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप हार्बर लाईन) दरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वेवर वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक
अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत जंबो ब्लॉक लागू करणार आहे. या ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)-वांद्रे-CSMT आणि CSMT/पनवेल-गोरेगाव-CSMT/पनवेल हार्बर लाईनवरील सर्व रेल्वे सेवा, तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेट लाईनवरील काही धीम्या गतीच्या रेल्वे सेवा रद्द राहतील.




























































