संसदेत पुढील आठवड्यात घमासान? सरकारनंतर काँग्रेसकडूनही खासदारांना ‘व्हिप’ जारी, सलग तीन दिवस सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आगामी आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकार पुढील आठवड्यात डिलिमिटेशन आणि परकीय योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक (FCRA) २०२६ विधेयक संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या सर्व खासदारांना तीन दिवसांसाठी व्हिप जारी करत सभागृहात सक्तीने उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

पावसाळी अधिवेशनात आता केवळ एकच आठवडा शिल्लक असून, सरकारने आपल्या सर्व खासदारांना पुढील आठवड्यात दिल्लीतच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही आपल्या खासदारांना व्हिप जारी करून सरकारच्या या महत्त्वपूर्ण विधेयकांचा सामना करण्याची तयारी केली आहे. विशेषतः एफसीआरए आणि परिसीमन विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद जयराम रमेश आणि लोकसभेतील मुख्य प्रतोद कोडिकुन्नील सुरेश यांनी हे व्हिप जारी केले आहेत.