
रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारत असल्याने डोंबिवलीकर त्रस्त आहेत. तसेच रात्री नऊनंतर रिक्षा बंद करून चालक निघून जातात. त्यामुळे रात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओसुद्धा उद्दाम रिक्षाचालकांवर काहीच कारवाई करत नसल्याने बुधवारी रात्री संतप्त प्रवाशांनी डोंबिवली पूर्वेतील केळकर रस्ता रिक्षा स्टॅण्डवर ठिय्या आंदोलन केले.
मागील अनेक दिवसांपासून डोंबिवली पूर्वेतील केळकर आणि पाटकर रस्ता परिसरातील रिक्षा वाहनतळांवर रात्री नऊ वाजल्यानंतर रिक्षाचालक प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा उभ्या करत नाहीत. विशेषतः मुसळधार पाऊस सुरू असताना अनेक रिक्षाचालक या परिसरात येण्याचे टाळतात. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून तासन्तास रिक्षाची वाट पाहावी लागत आहे.
रिक्षा वाहनतळावर रिक्षा उभी केल्यास प्रवाशांना शेअर पद्धतीने सोडावे लागते. मात्र संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनतळ रिकामे ठेवून अनेक रिक्षाचालक परिसरातील चौक आणि रस्त्यांवर थांबून थेट भाड्याच्या प्रवाशांची वाट पात असल्याचा आरोप संतप्त कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना रिक्षाचालकांच्या मनमानीला रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री डोंबिवली पूर्वेतील केळकर रस्ता रिक्षा वाहनतळावर प्रवाशांचा संताप अनावर झाला. रिक्षाचालकांनी नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी करत अडीच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मनमानीला चाप बसणार
कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना रिक्षाचालकांच्या मनमानीला रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री डोंबिवली पूर्वेतील केळकर रस्ता रिक्षा वाहनतळावर प्रवाशांचा संताप अनावर झाला. रिक्षाचालकांनी नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी करत अडीच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.






























































