
>> प्रसाद रमेश लाड
[email protected]
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या देशातील खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. यात महिला खेळाडूंना मिळालेले यश अर्थातच लक्षवेधी आहे. क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडूंचा हा चढता आलेख अनेक अडथळ्यांच्या शर्यतीपार ठरणारा आहे. जाणून घेऊया हा प्रवास.
स्त्राrच्या स्वतंत्र अस्तित्वाची दखल घेण्याचं हे युग म्हणावं लागेल, ज्याचा परिपाक आपल्याला नुकत्याच ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल ाढाrडा स्पर्धेत पाहायला मिळाला. हिंदुस्थानने 13 सुवर्णपदके जिंकली, ज्यामधली 8 गोल्ड मेडल्स ही महिलांनी पटकावलेली आहेत. गेल्या काही वर्षांत मुलींची आणि महिलांची ाढाrडा क्षेत्रात झालेला सहभाग हा वाखाणण्याजोगा आहे. हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1952 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये एकही महिला खेळाडू नव्हती. 2000 साली चार महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी झाल्या. तब्बल 48 वर्षे यासाठी लागली. पण गेल्या 26 वर्षांत महिला खेळाडूंच्या संख्येत झालेली वाढ ही लक्षणीय आहे.
खेळात करीअर होऊ शकतं, ही संकल्पनाच सुरुवातीला आपल्या देशात नव्हती. पण प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत काही महिला खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या आणि महिलांना यामध्येही आपले करीअर होऊ शकते, हे समजायला लागले. पी.टी. उषा यांनी महिला खेळाडूंना हा मार्ग दाखवला. पण या मार्गाचा विस्तार केला तो मेरी कोमने. हिंदुस्थानचा पूर्वप्रदेश सर्वांनाच ज्ञात. तिथली सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती इतरांपेक्षा जिकरीचीच. त्यामुळे प्रचंड संघर्ष आणि त्या संघर्षावर मात करण्यासाठी असलेली जिद्द सर्वात महत्त्वाची ठरते. मेरी कोमकडे पाहून बऱयाच मुलींना समजलं की, आपणही हे करू शकतो. मुलींची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जिद्द, एकाग्रता, चिकाटी आणि विजिगीषूवृत्ती.
मीराबाई चानूचाही उदय अशाच संघर्षामधून झालेला. बाबा श्रमिक कर्मचारी. त्यांचा पगार पुरत नव्हता. त्यामुळे आईने चहाची टपरी टाकली. हा व्यवसाय बाळसं धरायला लागला आणि त्यानंतर छोटंसं उपाहारगृह सुरू केलं. चहा आणि उपाहारासाठी लागणारं सरपण आणण्याची जबाबदारी मीराबाईवर. जंगलात जायचं आणि पाठीवर लाकडांचं ओझं वाहत घरी यायचं, हा तिचा नित्पाम. पण हेच वजन उचलणं तिला सुवर्णपदक मिळवून देईल, असं कोणाच्या स्वप्नातही नसेल. मीराबाई आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त उदयाला आलं नाही तर सोनेरी किरणांनी ते झळकलं. पण मीराबाई आपला भूतकाळ विसरली नाही. जेव्हा सुवर्णपदक पटकावून ती घरी परतली, त्यानंतर तिने या सर्व ट्रकचालकांचा घरी बोलावून सन्मान केला. यासाठी संस्कारच लागतात. आपली कामगिरी उंचावत आता तिसरे सुवर्णपदक तिने या स्पर्धेत कमावले आहे.
मीराबाईसारखीच काहीशी गोष्ट या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचत ज्युडोसारख्या खेळात हिंदुस्थानला प्रथम सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अस्मिता डे हिची. त्रिपुरामधल्या अस्मिताला प्रशिक्षकांनी अॅथलेटिक्सपेक्षा ज्युडोमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आणि अस्मिताचा ज्युडोविश्वात प्रवेश झाला. अस्मितासाठी तिचे वडील मित्र, मार्गदर्शक, तत्त्ववेत्ता होते. राष्ट्रकुल स्पर्धेला काही दिवस उरलेले होते आणि अस्मिताच्या वडिलांचे निधन झाले. ती नैराश्येच्या गर्तेत अडकली. पण अस्मिता पुन्हा खेळली आणि ग्लासगोमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक देशाला मिळवून दिले.
खेळात मुलींचं किंवा महिलांचं प्रमाण कसं वाढलं, याच प्रश्नांची उत्तरंही आता समोर येत आहेत. मुलींमध्ये काही गोष्टी उपजत असतात. मुलींची एकाग्रता सहसा भंग पावत नाही. एखादा मार्ग निवडला की, यशाचं शिखर गाठल्यावरही मुली जमिनीवरच असतात. फिटनेसबद्दलची मुलींची जागृकता कमालीची आहे. जेव्हा फिटनेस उत्तम असतो त्यानंतर बऱ्याच गोष्टी सुलभ होऊन जातात. 20 वर्षांपूर्वी मुली खेळाकडे जास्त वळत नव्हत्या. पण आता त्यांच्याकडे बघण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बदललेला आहे. आई-वडिलांपासून ते नवऱयापर्यंत सर्वांचा पाठिंबा त्यांना मिळायला लागला आहे. सध्याची पिढी ही टेक्नोसॅव्ही आहे. त्यांच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत.
एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे प्रशासनाची मदत. हरियाणा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. हरियाणामध्ये जी ाढाrडा संस्कृती रुजवली गेली, त्याचे हे फलित असल्याचे मान्य करावे लागेल. खेळाडूंनी पदकं जिंकली की, त्यांना डोक्यावर घेतलं जातं. त्यांना पुरस्कार मिळतात. रोख रक्कम दिली जाते. पण जेव्हा हे खेळाडू पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. संघर्ष करत असतात तेव्हा त्यांना कोणीही मदत करत नाही. ही गोष्ट हरियाणाच्या सरकारला समजली आणि त्यांनी क्रीडा संस्कृती रुजवली. पण बाकीच्या राज्यांना अशी क्रीडा संस्कृती रुजवता आली नाही, हे दुर्दैव आहे.
कुस्ती महाराष्ट्रातला खेळ. तो किती विकसीत व्हायला हवा होता. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकीला पदक जिंकलं होतं. त्यानंतर जवळपास अर्ध शतक होऊन गेलं. पण यामध्ये महाराष्ट्रातल्या मुली काही पुढे येऊ शकल्या नाही. हिंदकेसरीपर्यंत त्या मर्यादित राहिल्या. त्यांमध्ये जिगीषा नसल्याचंच पाहायला मिळालं. मिझोरम पेटत होतं, पण पदकं आली. नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीममधल्या महिलांचं यश देदीप्यमान आहे. पण सुसंस्कृत, सुजलाम्, सुफलाम् महाराष्ट्राच्या लेकी हे यश कधी मिळवणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला खेळाडूंनी पदकांची केलेली लयलूट निश्चितच आशादायी चित्र निर्माण करणारी आहे. महाराष्ट्राच्या लेकीही येत्या काही वर्षांत राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक जिंकता दिसतील, अशी आशा तरी सध्या करायला हरकत नसावी.

























































