
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीदरम्यान अनेक विद्यार्थी अर्ज भरताना चुका करतात. त्यामुळे पुढील प्रक्रियेमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन अर्जातील चुका दुरुस्त करण्यास संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आयएमएच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने लॉगिनमध्ये दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून दिला असून 12 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत अर्जातील तपशील दुरुस्त करता येणार आहे.

























































