
डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे तपासणी करताना इमारतीवरून तोल जाऊन खाली पडल्याने महापालिका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.
महापालिकेच्या पीसीओ विभागातील कर्मचारी पांडुरंग तोडकर (47) हे डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे तपासण्यासाठी बीडीडी चाळ क्रमांक 6-अ येथे गेले होते. पाहणी करत असताना त्यांचा इमारतीवरून अचानक तोल गेला आणि ते खाली पडले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
























































