राज्य कॅरम स्पर्धेत मैत्रेयीची आगेकूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे येथे आज विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत मुंबईच्या मैत्रेयी गोगटेने दमदार विजय मिळवला. मैत्रेयीने मुंबईच्या अंबिका हरिथला तीन सेटच्या झुंजीनंतर 2-25, 20-15, 18-17 असे नमवून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला.

इतर निकाल पुढीलप्रमाणे

पुरुष एकेरी सागर वाघमारे (पुणे) वि. वि. रियाझ अकबर अली (रत्नागिरी) 21-2, 25-4. प्रशांत मोरे (मुंबई) वि. वि. विवेक पोद्दार (मुंबई) 25-16, 25-8. नीलांश चिपळूणकर (मुंबई) वि. वि. अभिषेक चव्हाण (रत्नागिरी) 25-7, 25-0.  महिला एकेरी समृद्धी घाडीगावकर (ठाणे) वि. वि. पुष्कर्णी भट्टड (पुणे) 23-9, 13-7. प्राजक्ता नारायणकर (मुंबई) वि. वि. निधे सप्रे (रत्नागिरी) 16-20, 25-4, 25-4. तनया पाटील (पुणे) वि. वि. मिताली पाठक (मुंबई) 24-23, 10-19, 15-6 .