
शिक्षण, आरोग्य, क्रीडा, राजकारण आणि समाजकारणात अतुलनीय योगदान दिलेले शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजी वाहण्यासाठी मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी नेरुळ येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये दुपारी ३ ते सायंकाळी ७ या कालावधीत होणार आहे.
या आदरांजली सभेच्या माध्यमातून डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आणि महान कार्याला अभिवादन केले जाणार आहे. त्यांच्या जीवन प्रवासाने प्रेरित झालेल्या आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या सर्व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईतील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.




























































