
यंदाच्या वर्षी मुंबई शहर आणि उपनगरात गोपाळकाला (दहीहंडी) सणाऐवजी रक्षाबंधन सणाला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
शनिवार, ५ सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे, तर रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी आहे. गोपाळकाल्याऐवजी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असेल असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

































































