
दिल्ली विमानतळावर प्रवाशाच्या हँड बॅगमध्ये मानवी कवटी आढळल्याने खळबळ उडाली. विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान ही बाब उघड झाली. सीआयएसएफने प्रवाशाला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्या प्रवाशाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी दिल्लीहून हैदराबादला चालला होता. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला असता सुरक्षा तपासणीदरम्यान आरोपीच्या हँड बॅगेत मानवी कवटी आढळली. प्रवाशाने ती माकडाची कवटी असल्याचा दावा केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
विमानतळावरील ‘प्री-एम्बार्केशन’ सुरक्षा तपासणीदरम्यान ही घटना उघड झाली. यानंतर वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्या प्रवाशाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा तपास सुरू आहे.


























































