शुभवार्ता! स्टेट बँकेत ’मेगाभरती’; 9 हजार 124 जागा भरणार, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) देशभरात नऊ हजारांहून अधिक जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. ही सर्व पदे ज्युनियर असोसिएट्स म्हणजेच क्लर्कची आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. नियमित भरती अंतर्गत 7 हजार 680 आणि बॅकलॉग भरती अंतर्गत 1 हजार 444 अशी एकूण 9 हजार 124 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती देशातील वेगवेगळ्या राज्यांत केली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट recruitment.sbi.bank.in वर देण्यात आली आहे.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात किंवा शेवटच्या सत्रात आहेत, तेदेखील अर्ज करू शकतात. परंतु त्यांची निवड झाल्यास, त्यांना 31 डिसेंबर 2026पर्यंत त्यांचे पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 28 वर्षे असायला हवे. सर्वात आधी सप्टेंबर 2026ला पूर्व परीक्षा आणि त्यानंतर नोव्हेंबर 2026ला मुख्य परीक्षा घेतली जाईल. या दोन्ही परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणी घेतल्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला 24050-64480 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल तसेच नियमांनुसार, मिळणारे भत्तेही दिले जातील. ही भरती पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

नियमित भरती

महाराष्ट्र     1782

तामीळनाडू    1410

ओडिशा      1100

कर्नाटक        760

पश्चिम बंगाल   630

राजस्थान     350

गुजरात         330

छत्तीसगड    287

तेलंगणा        260

उत्तर प्रदेश     250

मध्य प्रदेश    113

आसाम         110

अरुणाचल प्रदेश  55

त्रिपुरा             48

मेघालय          24

पंजाब             24

मिझोराम        32

नागालँड          27

मणिपूर           14

 एकूण        7680

बॅकलॉक 

महाराष्ट्र        282

तामीळनाडू     106

ओडिशा            18

कर्नाटक           39

पश्चिम बंगाल  166

राजस्थान         75

गुजरात          305

छत्तीसगड         64

तेलंगणा           75

उत्तर प्रदेश        30

मध्य प्रदेश     159

आसाम            97

अरुणाचल प्रदेश  17

त्रिपुरा               08

मेघालय           20

पंजाब              28

मिझोराम         06

नागालँड           15

अरुणाचल प्रदेश  17

मणिपूर            09

एकूण          1444