
आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करत त्यांना “आत्मविश्वासाचा अभाव असलेले, घाबरलेले आणि डळमळीत पंतप्रधान” म्हटले आहे. केजरीवाल यांनी आज ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर करत ही टीका केली आहे.
केजरीवाल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थानच्या जैव-अर्थव्यवस्था क्षेत्राबद्दल बोलत आहेत. केजरीवाल यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, भाषणादरम्यान पंतप्रधानांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव, भीती आणि डळमळीतपणा दिसत होता.
An under-confident, nervous and shaky Prime Minister. pic.twitter.com/XQeTxhJJOF
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 15, 2026





























































