
सीबीआयने तीन राज्यांत केलेल्या भ्रष्टाचाराच्या कारवाईत सहा रेल्वे अधिकाऱयांकडे मोठे घबाड सापडले आहे. सीबीआयने जयपूरमध्ये उत्तर पश्चिम रेल्वे कार्यालयातील अधीक्षक, एक सहाय्यक वित्तीय सल्लागार आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांच्याकडे 1.46 लाखांच्या लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छापेमारीत 77 लाख रोख आणि 14 लाखांचे सोने-चांदीचे दागिने मिळाले आहेत. तर दुसऱया लाचखोर व्यक्तीकडे 1.20 लाखांची रोकड आणि 1.46 लाखांच्या लाचेची रोकड मिळाली आहे.























































