
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून या वर्षी आतापर्यंत मूर्तिकरांना तब्बल तीन हजार लिटर इकोफ्रेंडली कलरचे वाटप करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईतील 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. गणेशोत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाकडून रंगांचे वाटप करण्यात आले आहे. महापालिकेच्या 26 वॉर्ड कार्यालयांमार्फत गणेशमूर्तिकारांना ऑरेंज, लाल, निळा, काळा, पिवळा आणि हिरवा अशा सहा रंगांचे वितरण करण्यात आले आहे. याआधी पालिकेने मूर्तिकारांना शाडूच्या मातीचे वाटप केले आहे.

























































