केनियात पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केनियात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर बुधवारी कोसळले. या दुर्घटनेत सात पर्यटकांचा मृत्यू झाला. केनियाची राजधानी नैरोबीच्या उत्तरेकडील सांबुरू काउंटीमध्ये ही दुर्घटना घडली. अपघातात सहा पर्यटक आणि एका वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातात मृत झालेल्या पर्यटकांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, लोइसाबा वन्यजीव राखीव क्षेत्रातून उड्डाण केल्यानंतर स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.13 वाजता हा अपघात झाला, असे केनिया सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने सांगितले. विमानात सहा पर्यटक आणि एक वैमानिक होते. हे हेलिकॉप्टर पर्यटकांना निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी घेऊन जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील मृत झालेल्या पर्यटकांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.