
तुमची फिक्स डिपॉझिट मुदत संपून 10 वर्षे लोटली तरी कोणीही ती क्लेम केली नाही, तर ती बँक ‘अनक्लेम्ड डिपॉझीट’ म्हणून घोषित करते.
रक्कम RBI च्या विशेष फंडमध्ये (DEAF) जमा करते. मुदत संपल्यावर FD आपोआप पुढच्या समान मुदतीसाठी पुन्हा बुक होते.
काही बँकांच्या नियमांनुसार मॅच्युरिटीचे पैसे थेट तुमच्या जोडलेल्या बचत खात्यात जमा होतात. जर पैसे तसेच पडून राहिले, तर ते आरबीआयच्या फंडात जातात.
तुम्ही योग्य कागदपत्रांसह अर्ज करून मूळ पैसे आणि व्याज परत मिळवू शकता. जुने फिक्स डिपॉझिट्स शोधण्यासाठी UDGAM Portal चा वापर करू शकता.
एफडी मोडण्याऐवजी तुम्ही त्यावर बँकेकडून सहज कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता, ज्यामुळे तुमची गुंतवणूकही सुरक्षित राहते आणि गरजही भागते.




























































