
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख आणि विदीत गुजराथी यांना ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. कोकणातील नेमबाजी प्रशिक्षिका नेहा चव्हाण यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या केंद्रीय पुरस्कारांमध्ये क्रीडा चाहत्यांना खटकणारी गोष्ट म्हणजे यावेळी कोणालाही ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही.
नेहा चव्हाण या रायफल शूटिंगमधील एक प्रख्यात हिंदुस्थानी प्रशिक्षिका आहेत. त्याचबरोबर नेमबाजपटू घडवणाऱ्या ‘गन फॉर ग्लोरी शूटिंग अकादमी’मधील वरिष्ठ प्रशिक्षक आहेत. दुहेरी ऑलिंपियन इलावेनिल वलारिवन आणि रमिता जिंदाल यांसारख्या उच्च दर्जाच्या नेमबाजांना नेहा चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे.
दिव्या देशमुख ही हिंदुस्थानची बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत. तिने महिला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. विदित गुजराती हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत. जानेवारी 2013 मध्ये विदितने ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता, तो हिंदुस्थानचा 30 वा खेळाडू ठरला.

























































