शस्त्रक्रियेनंतर ग्लोव्हज्, पेपर नॅपकिन महिलेच्या पोटातच राहिले! बीडमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्र्ाक्रिया करताना डॉक्टर मेडिकल ग्लोव्हज् आणि पेपर नॅपकिन महिलेच्या पोटातच विसरले! चार दिवसानंतर महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला. सध्या या महिलेवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

पंधरा दिवसांपूर्वी बीड येथील संध्या सूरज गायकवाड (19) हिला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सिझेरियन शस्त्र्ाक्रियेनंतर संध्याने गोंडस बाळाला जन्म दिला. चार दिवसानंतर संध्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सोनोग्राफी केल्यानंतर संध्याच्या पोटात मेडिकल ग्लोव्हज् आणि पेपर नॅपकिन असल्याचे आढळले. सध्या तिची पुण्यात मृत्यूशी झुंज सुरू आहे.