फलंदाजाने चेंडू मारला अन् थेट अंपायरच्या जबड्यावर लागला, ICU मध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. चालू सामन्यात फलंदाजाने मारलेला चेंडू थेट ऑन-फिल्ड अंपायरच्या तोंडाला लागला आणि खेळाडूंसह सर्वच भयभीत झाले. अंपायच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2026) दरम्यान ईस्ट दिल्ली रायडर्स आणि न्यू दिल्ली टायटर्स यांच्यामध्ये सामना सुरू होता. सामना सुरू असताना न्यू दिल्लीच्या डावातील 18 व्या षटकात फलंदाज लक्ष्य थारेजा याने मारलेला एक अत्यंत वेगवान स्ट्रेट ड्राईव्ह थेट ऑन-फिल्ड अंपायरच्या चेहऱ्यावर आदळला, ज्यामुळे मैदानात एकच खळबळ उडाली. चेंडू लागल्याने पंच धर्मेश भारद्वाज यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली आणि ते मैदानावरच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयू (ICU) मध्ये ठेवण्यात आले आहे. या हंगामात त्यांच्यासोबत घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना असून, यापूर्वीही एका सामन्यादरम्यान त्यांना चेंडू लागला होता.