‘डी-कंपनी’चा हस्तक अख्तर मर्चेंटला दिल्लीतून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’चा हस्तक अख्तर मर्चेंटला दिल्लीतून अटक करण्यात आली. अख्तर मर्चेंट असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय रेड नोटीस जारी झालेली आहे. मीरा भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेच्या काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. खंडणीच्या गुन्ह्यात तक्रारदाराला फोन करून पैशांची मागणी करत धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

अख्तर मर्चेंट याचे नालासोपारा येथे वास्तव्य होते. दिल्लीतील स्थानिक न्यायालयात अख्तर मर्चेंटला हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर त्याला मीरा-भाईंदरमध्ये आणण्यात येणार आहे. या कारवाईमुळे मीरा-भाईंदर शहरातील संघटित गुन्हेगारी विरोधातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गोंडुराम बांगर करत आहेत.