
कल्याणपुरी परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आम आदमी पार्टीचे पूर्व दिल्लीचे आमदार कुलदीप कुमार यांचे साध्या वेषातील पोलिसांनी अपहरण करून त्यांना अज्ञात स्थळी नेल्याचा गंभीर आरोप आपने केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी पहाटे वाजताच्या सुमारास साध्या वेषातील सुमारे 20 पोलिसांनी आमदार कुलदीप कुमार यांच्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले, असा दावा ‘आप’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून केला. ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार संजीव झा हे डीसीपींची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
Delhi VP & MLA @Sanjeev_aap is reaching DCP, East to find the whereabouts of our MLA Kuldeep Kumar. https://t.co/aaoyPsfN8e
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) August 18, 2026
काय आहे प्रकरण?
कल्याणपुरी भागात अनिल नावाच्या ऑन-ड्यूटी सफाई कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या हजारो सफाई कर्मचारी आणि ऑटो-टिपर चालकांनी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयाबाहेर गेली दोन दिवस तीव्र निदर्शने केली. मृत सफाई कर्मचारी अनिल यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची भरपाई मिळावी, कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वतः पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
जबरदस्तीने अंत्यसंस्कार
आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेण्यास आणि शहरातील ऑटो-टिपर गाड्या चालवण्यास नकार दिला होता. मात्र शासनाने आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी पोलिसांचा वापर करून मृतदेह जबरदस्तीने रुग्णालयाच्या शवागारातून त्यांच्या घरी आणला आणि पोलिसांच्या दबावाखाली अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला.
पुलिस जबरदस्ती मृत सफाई कर्मचारी का दाह संस्कार करवाना चाह रही है।
मृत सफाई कर्मचारी के परिवार के सदस्य चाहते हैं कि उन्हें न्याय मिले।
मृत सफाई कर्मचारी दलित समाज से हैं और गरीब हैं, इसलिए दिल्ली पुलिस उस परिवार पर दबाव बनाकर जबरदस्ती अंतिम संस्कार करवाना चाह रही है। pic.twitter.com/3tl2mlR9Bc
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) August 18, 2026



























































