मध्य वैतरणाचे पाचही दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुसळधार पावसामुळे मोखाडा व परिसरातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मध्य वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून आज धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे.

मध्य वैतरणा धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले होते. आज १, ३ व ५ दरवाजे २० सेमी ने उघडण्यात आले आहेत. यामधून ३००२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही नदीपात्रात गुरेढोरे सोडू नये अथवा कोणत्याही व्यक्तीने नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केले आहे.