
तडीपारीनंतरही खुलेआम ठाणे शहरात वावरणाऱ्या तीन गुन्हेगारांना वागळे इस्टेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अरशद खान (23), अजय त्रिभुवन (28) आणि रोमी गवंदे (32) अशी या तीन आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शोधपथकातील पोलीस तडीपार आरोपींची तपासणी करीत होते. त्यावेळी हाजुरी चौकातील सार्वजनिक शौचालयाजवळ अरशद खान आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. तपासात त्याच्याविरुद्ध १८ महिन्याची हद्दपारी असल्याचे निष्पन्न झाले. याच दिवशी मौलाना स्कूलच्या मागे अजय त्रिभुवन हा आढळून आला. त्याच्यावरही १८ महिन्यांची हद्दपारी होती. तसेच याच परिसरात रोमी गवंदे यालाही पोलिसांनी पकडले. त्याच्यावर १२ महिन्यांची हद्दपारी असल्याचे तपासात समोर आले. तिघांवरविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.





























































