
आम आदमी पक्षाचे आमदार कुलदीप कुमार यांना दिल्ली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्याचा आरोप आपने केला आहे. या घटनेवर संताप व्यक्त करत, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली असून, ‘हा देश तुमची गुंडगिरी खपवून घेणार नाही’, असा इशारा दिला आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाल आहेत.
दिल्लीतील कल्याणपुरी भागात अनिल कुमार या सफाई कर्मचाऱ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. अनिल हे आपले सफाईचे काम करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संपावर जाऊन निदर्शने सुरू केली होती. पीडित कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी होती. आमदार कुलदीप कुमार यांनी या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबासाठी भरपाईचा मुद्दा उचलून धरला होता. आपचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला आहे की, मंगळवारी पहाटे ४ वाजता साध्या वेशातील सुमारे २० लोक कुलदीप कुमार यांच्या घरी आले आणि त्यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले.
यावरून केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना थेट सवाल केला आहे, “पंतप्रधान मोदीजी, आमचे आमदार कुलदीप कुमार कुठे आहेत? आज पहाटे ४ वाजता तुमच्या दिल्ली पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून उचलले, घरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि डीव्हीआर सोबत घेऊन गेले. तुमचे पोलीस आम्हाला काहीच सांगत नाहीत. जर पोलीस एका आमदाराला कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारण न देता अशा प्रकारे घरातून उचलून नेत असतील, तर या देशातील सामान्य माणूस मदतीसाठी कोणाकडे जाणार? देश ही गुंडगिरी खपवून घेणार नाही “
प्रधानमंत्री मोदी जी,
हमारे विधायक कुलदीप कुमार कहाँ हैं?
सुबह 4 बजे आपकी दिल्ली पुलिस कुलदीप कुमार को उनके घर से उठा ले गई, CCTV तोड़ दिए और DVR साथ ले गई। आपकी पुलिस कुछ नहीं बता रही।
अगर एक विधायक को बिना किसी जानकारी के बिना किसी कारण इस तरह पुलिस घर से उठा कर ले जा… https://t.co/uxYK1wTABb
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 18, 2026





























































