हवेत प्रवाशाची प्रकृती खालावली, इंडिगोच्या विमानाचं जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने इंडिगोच्या विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरुवातीला प्रवाशाला विमानातच प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने वैद्यकीय आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान लँडिंग होताच प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E-6852 हे विमान बुधवारी सायंकाळी सुरतहून जयपूरला चालले होते. हवेतच प्रवाशाची प्रकृती खालावल्याने बुधवारी सायंकाळी 5.36 च्या सुमारास इंडिगो विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले. विमानतळ प्रशासनाने प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.