
सेंट्रल आफ्रिकी रिपब्लिकच्या पश्चिम भागात सोन्याची खाण कोसळली. या दुर्घटनेत किमान 30 खाण कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नाना-माम्बेरे प्रांतातील अब्बा परिसरात खाण कोसळली. बचाव पथक आणि स्थानिकांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 30 मृतदेह बाहेर काढले आहेत. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी या विभागाच्या महापौरांनी स्वयंसेवी संस्था आणि जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.

























































