ट्रम्प यांच्या सणकी निर्णयाची चर्चा; 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली अन् क्षेवटच्या क्षणी केला करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या सणकी निर्णयामुळे नेहमी चर्चेत असतात. आता ते अशाच एका निर्णयामुळे चर्चेत आहेत. त्यांनी कॅनडावर ५०% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती आणि हे उच्च शुल्क बुधवारी लागू होणार होते.मात्र, शेवटच्या क्षणी ट्रम्प यांनी आपला निर्णय बदलून ते पुढे ढकलले. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेल्या शेवटच्या क्षणी करार झाला आणि या करारानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील ५०% आयात शुल्क स्थगित केले आहे. हे शुल्क लागू होण्याआधी क्षेवटच्या क्षणी दोन्ही देशात एक करार झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली. त्यांनी २० अब्ज डॉलर किमतीच्या कॅनेडियन आयातीवरील ५०% अमेरिकन शुल्क पुढे ढकलत असल्याची घोषणा केली. शुल्क लागू होण्याच्या काही तास आधीच दोन्ही देशांमध्ये शेवटच्या क्षणी झालेल्या करारानंतर हा निर्णय घेण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे दोन्ही देशांना वाटाघाटींसाठी अधिक वेळ मिळाला आहे आणि या दीर्घकाळच्या मित्र राष्ट्रांमधील आधीच तणावपूर्ण असलेल्या संबंधांमध्ये आणखी ताण येण्यापासून बचाव झाला आहे. बुधवारी मध्यरात्री १२:०१ वाजण्याच्या अंतिम मुदतीच्या दोन तासांपेक्षा कमी वेळ आधी ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये ही घोषणा केली.

ट्रम्प म्हणाले की, मी कॅनडावरील ५०% शुल्क, जे उद्या सकाळी लागू होणार होते, ते तीन दिवसांसाठी स्थगित केले आहे. हे यासाठी करण्यात आले आहे कारण कॅनडा आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला आहे, जो कागदपत्रांना अंतिम स्वरूप देण्याच्या अधीन आहे!”

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर जाहीर केलेल्या ५०% शुल्काचा, कॅनडातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा होती. कॅनेडियन आयातीवरील या ट्रम्प कराचा परिणाम एकूण आयातीच्या अंदाजे ५% वर होऊ शकतो. यामध्ये हॉकी स्टिक्सपासून ते टंग डिप्रेसर्सपर्यंतच्या उत्पादनांचा समावेश होता. आर्थिक परिणामापेक्षा राजकीय परिणाम अधिक मोठा आहे.

कोणत्याही नवीन शुल्काच्या प्रत्युत्तरात कॅनडाने अमेरिकेवर स्वतःचे शुल्क लादण्याची धमकी दिल्याने, दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा व्यापार युद्ध पेटू शकले असते. गेल्या वर्षी या दोन देशांमध्ये ८८० अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू आणि सेवांचा व्यापार झाला होता.त्यामुळे सध्यातरी हे व्यापारयुद्ध पेटण्याची शक्यता नाही.