
लग्नाचा मंडप सजला होता, वरात दारात आली होती आणि वर-वधूंमधील नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. मात्र, याच दरम्यान एक अशी घटना घडली ज्याची चर्चा सध्या संपूर्ण सोशल मीडियावर रंगली आहे. वरातीमध्ये अचानक वधूचा प्रियकर पोहोचला आणि त्याने नवरदेवापुढे असा दावा केला की सगळ्यांच्या आनंदावर विरझण पडले.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, शेरवानी घातलेला नवरदेव वधूला घेऊन जाण्यासाठी गाडीतून उतरताना दिसतो. त्याच वेळी नवरदेवाचा एक मित्र तिथे येतो आणि एका व्यक्तीशी त्याची ओळख करून देतो. तो व्यक्ती आपण वधूचा जुना मित्र असल्याचे सांगतो. सुरुवातीला नवरदेव त्याला लग्नात आलेला सामान्य पाहुणा किंवा मित्र समजतो. मात्र नवरदेवाचा मित्र त्याला सावध करतो आणि मैत्रीचा खरा अर्थ स्पष्ट करतो. त्यानंतर तो तरुण नवरदेवाला स्वतःचे आणि वधूचे काही खास फोटो दाखवतो. हे फोटो पाहताच नवरदेव अत्यंत हादरून जातो आणि घाबरलेल्या आवाजात विचारतो की, “तुम्ही आधी का येऊ शकला नाहीत? माझ्या वडिलांचे सर्व पैसे या लग्नात खर्च झाले आहेत.” या सत्य परिस्थितीचा सामना केल्यानंतर, नवरदेव थेट वधूकडे जातो आणि तिच्याकडे या नात्याबद्दल जाब विचारतो. हा संपूर्ण प्रसंग व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे.
View this post on Instagram
‘delhi24hours’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्संनी नवरदेवाबद्दल सहानुभूती व्यक्त करत, वेळेत सत्य समोर आल्यामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असल्याचे म्हटले आहे. तर काही युझर्सनी या व्हिडिओची पटकथा आणि सर्वांचा अभिनय उत्कृष्ट असल्याचे सांगत हा एक स्क्रिप्टेड व्हिडिओ असावा असाही अंदाज वर्तवला आहे.



























































