विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी, प्रभारीपदी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून भाजपने उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी आज खासदार विनोद तावडे यांची नियुक्ती केली. भाजपचे कार्यालय प्रभारी तरुण चुग यांनी ही घोषणा केली.

नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली कालच भाजपची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात महासचिव म्हणून तावडे यांनी आपले पद अबाधित राखले. त्यानंतर आज लगेचच तावडे यांची यूपीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने 2027 च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपापुढे मोठे आव्हान आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यात कायमच संबंध तणावाचे आहेत. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

मंत्रीपदावर उदक

तावडे यांच्याकडे यूपीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांचे नाव पेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य यादीतून वगळले जाईल असे मानले जात आहे. गुजरातचे जगदीशभाई पटेल हे यूपीचे सहप्रभारी असतील. गुजरातच्या प्रभारीपदी तरुण चुग, तर पंजाबच्या प्रभारीपदी सतीश पुनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.