
अमेरिकेतील पश्चिम अलास्कामध्ये एका दुर्गम रडार केंद्राजवळ चार्टर विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती एका संघीय अधिकाऱ्याने दिली. केप न्यूएनहॅम लॉन्ग रेंज रडार साइटजवळ गुरुवारी ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच शोध आणि बचाव मोहीम सुरू केल्याचे अलास्का रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरने सांगितले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सेसना 441 हे चार्टर विमान गुरुवारी दुपारच्या सुमारास केप न्यूएनहॅमकडे चालले होते. विमानाने अँकरेज येथून उड्डाण केले आणि केप न्यूएनहॅमकडे जात असताना पश्चिम अलास्कामध्ये रडारजवळ कोसळले. विमानात दोन वैमानिक आणि सहा प्रवासी होते. विमानाच्या अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.


























































