तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा अमेरिका दौरा रद्द; केंद्राने परवानगी नाकारली 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगाणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांच्या नियोजित अमेरिका दौऱ्याला केंद्राने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तेथूनच ते अमेरिकेला (USA) भेट देऊन 30 ऑगस्ट रोजी हैदराबादला परतणार होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील ‘तेलंगाणा रायझिंग’ (TelanganaRising) या अधिकृत शिष्टमंडळाला अमेरिकेचा दौरा रद्द करावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) राजकीय दृष्टिकोनातून या दौऱ्याला मंजुरी नाकारली आहे, असे सांगण्यात आले आहे.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अमेरिकेतील बॉस्टनला जाण्याऐवजी 23 ऑगस्ट रोजी लंडनहून थेट हैदराबादला परतणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.