
देशात तरुणांमध्ये सध्याच्या व्यवस्थेविरोधात प्रचंड रोष असून देशातील हुकूमशाही वृत्तीचा कारभार आता संपण्याच्या मार्गावर आहे, यामुळे तरुण पिढीने राजकीयदृष्ट्या सजग राहावे, असे विधान अभिनेते प्रकाश राज यांनी केले आहे.
केरळमधील त्रिशूर येथील डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या राजस्तरीय परिषदेत ते बोलत होते. देशातील तरुणांना आता खरी परिस्थिती समजली आहे.
पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून तरुणांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे. आम्ही तुम्हाला ओळखले असून घाबरत नाही. दिल्लीतील आंदोलनांनी सरकारचा अहंकार मोडून काढला आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर तोफ डागली.


























































