
>> गणेश हर्सलकर
अल् निनोमुळे पावसाची टक्केवारी घटणार असल्याचे हवामान खात्याचे भाकित खरे ठरत आहे. तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे तांदळाच्या किंमती अचानक १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तांदळाबरोबरच रोजच्या जेवणात आवश्यक असलेले कांदा, अद्रक तसेच लसूणही आवक घटल्यामुळे महाग झाले आहेत.
भारतात तेलंगाणा, कर्नाटक, महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, नाशिक तसेच कोकणात शेतकऱ्यांचे खरीपाचे मुख्य पीक तांदूळ आहे. येथील तांदूळ उत्पादक शेतकरी हे देशभरातील यावर्षी अल-निनोमुळे कमी पाऊस पडणार राज्यांना तांदूळ पुरविण्याचे काम करतात. मात्र असल्याचे भाकित हवामान खात्याने केले. याचा प्रत्यय हा जूनमध्ये पेरण्या खोळंबल्याने आला. लागवडीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याने भाताची पेरणीही उशीरा झाली. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार असल्याने मुख्य बाजारपेठेतील तांदळाची आवकच कमी झाली. येईल. परिणामी तांदळाच्या किंमतीमध्ये १५ नवीन तांदूळ बाजारात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये टक्के एवढी जबर वाढ झाली आहे.
बाजारात सर्वात जास्त विकला जाणारा सोना मसुरी तांदूळ हा जूनमध्ये ४५ ते ५० रुपये किलो मिळत होता. कालीमूछ ५१ ते ५५ रुपये किलो होता. सध्या सोना मसुरी तांदूळ ५८ ते ६१ तर कालीमूछ ६५ ते ७० रुपये किलो मिळत आहे. सुगंधी चिन्नोर, आंबेमोहोरही महागले आहेत.
हीच परिस्थिती आद्रक, कांदा आणि लसूणाच्या बाबतीत आहे. खरीपात शेतकऱ्यांनी आद्रकीची लागवड मोठया प्रमाणात केल्यामुळे तिची बाजारातील आवक घटली आणि परिणामी किंमत दुप्पट झाली आहे. तसेच नवीन कांदा येण्यासाठी अजून दोन महिने वाट पहावी लागणार असल्याने कांदाही दुप्पटीने महागला असून ३० ते ५० रुपये प्रती किलो विक्री होत आहे. याचप्रमाणे लसणाची लागवड ही नोव्हेंबर मध्ये होणार असल्याने बाजारातील आवाक घटली आणि ठोक बाजारात लसण हा १७ ते २४ हजार रुपये क्विंटल प्रमाणे विक्री होत आहे.
शहरात आठवडयाला साडेचार ते पाच हजार टन तांदूळ ब्रिक्री श्रावणापासून हिंदुच्या सणांना सुरुवात होते. याच महिन्यात नागपंचमी, राखी पौर्णिमा, पोळा, पुढे गणपती, पितृ पंधरावाडा, नवरात्र दसरा आणि यानंतर ते येते ती दिवाळी अशी पुढील दोन महिन्यात सणांची मोठी रेलचेल आहे. सण समारंभ म्हटले की जेवणाच्या ताटात तांदूळाचा भात हा मुख्य मेन असतो. यामुळे तांदूळला मोठी मागणी असते. ही मागणी पुरविण्यासाठी शहरातील व्यापारी हे कर्नाटकातून सोना मसुरी, तेलंगाणातून कोलम, चंद्रपूरचा कालीमूछ आणि घुटी येथून इंद्रायणी या तांदूळाच्या व्हरायटी विक्रीसाठी आणतात. यामुळे शहरातला दर आठवडयाला साडेचार ते पाच हजार टन तांदूळ विक्रीसाठी लागत असल्याचे तांदळाचे ठोक व्यापारी निलेश सोमाणी यांनी सांगितले.
बीअर आणि इथेनॉलसाठी तांदळाचा वापर
पाच वर्षापूवी बाजारात तुकडा तांदूळही मिळायचा. हा तांदूळ गोरगरिबांच्या आवाक्यातला होता. मात्र हा तुकडा तांदूळ मद्यसम्राट दारूसाठी आणि इथेनॉलसाठी पेट्रोलियम कंपन्या खरेदी करत असल्यामुळे हा तांदूळ मुख्य बाजारातून गायब झाला आहे. तुकडा तांदळाची बाजारपेठ प्रचंड मोठी होती. आता हा सर्व ग्राहक इतर तांदळाकडे वळल्यामुळेही तांदळाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.




























































