
नेपाळमध्ये अद्यापही संकटांची मालिका सुरुच आहे. तिबेटमध्ये बांध फुटल्याची माहिती असून त्यामुळे नेपाळला महापुराचा आणि त्यामुळे मोठ्या विनाशाचा धोका आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशरा चीनसोबत नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याने धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतात शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. लोंगचांग शहरात ५.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. नेपाळ आधीच पूर आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींशी झुंज देत आहे, ज्यामुळे संपूर्ण हिमालयीन प्रदेशात संभाव्य भूगर्भीय हालचालींमुळे चिंता वाढली आहे.
लोंगचांग शहरात भूकंपानंतर कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र लोंगचांग शहर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, काल रात्री उशिरा नेपाळमध्ये भूकंप झाला होता. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ३.२ तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद झाली, मात्र त्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र, नेपाळमधील नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर या भागातील चिंता वाढली आहे.




























































