
एका फ्लॅटमध्ये एमडी (MD) बनवत असताना रंगेहाथ पकडलेल्या ड्रग्ज माफियांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. एटीएसच्या (ATS) चारकोप युनिटने त्या आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केल्याने सहाजणांना २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठाोठावली आहे.
वर्ष २०१५ मध्ये एटीएसच्या चारकोप युनिटने एका फ्लॅटवर छापा टाकून तेथे सुरू असलेला एमडी बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या गुन्ह्यात सात आरोपींना अटक करण्यात आली होती. युनिट प्रभारी शामल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी सपोनि आकाश शाही, अंमलदार राम शिंदे यांनी न्यायालयात वेळोवेळी सबळ पुरावे सादर करून आरोपींचे कारस्थान उघड पाडले.
पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे सत्र न्यायालयाने सचिन बागूल, साजिद इलेक्ट्रिकवाला, चंद्रकांत कातळे, राहुल साळुंखे, अयूब खान, भानुदास मोरे या सहा ड्रग्ज माफियांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावास व दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.






























































