नागपूरमधील 102 पर्यटक आज परतणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काठमांडू येथे अडकलेले नागपूर जिह्यातील नागरिक परतीच्या वाटेवर आहेत. श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत पर्यटन व धार्मिक भेटीसाठी नेपाळला गेलेल्या सुमारे 106 नागरिकांपैकी 102 जण रविवार, 30 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता ते नागपुरात दाखल होतील. चार जण विमानाने नागपूरला रवाना झाले आहेत, तर 102 जण रेल्वेने नागपूरला येणार आहेत.

एमएसईबीचे निवृत्त अधिकारी सुनील सभेदार हे नागपुरातील गिरीपेठ भागातील रहिवासी आहेत. तेही कैलास मानसरोवर येथे यात्रेसाठी गेले होते. त्यांच्यासोबत 160 जण असल्याचे सांगण्यात येते.