मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश; 10.75 कोटींचे सोने जप्त, 6 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 10.75 कोटी रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोने तस्करी करणाऱ्या टोळीत दुबई, बँकॉक आणि माले दरम्यान मुंबईमार्गे प्रवास करणारे प्रवासी, तसेच विमानतळावरील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. डीआरआयच्या पथकाने 29 ऑगस्ट रोजी ऑपरेशन मिडनाईट गोल्डस्ट्राइक राबवले. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला पकडले. त्याच्याकडून सोन्याच्या सात कॅप्सूल जप्त केल्या.

डीआरआय अधिकाऱ्यांनी केलेल्या पुढील कारवाईमुळे टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्यात आली. तसेच या आरोपींकडून आणखी सोन्याच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. एकूण 16 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.